ग्रामविकास समितीची थोडक्यात माहिती
ग्रामसंकल्प अभियानाचे कामकाज : अनाथ वंचित घटकातील मुलांचे पुनर्वसन करणे, त्यांना अन्न, वस्त्र, निवारा,शिक्षण,आरोग्य इ. जीवनावश्यक सूविधा पुरविणे. निराधार, अनाथ, बेघर, आत्महत्याग्रस्त, शेतकऱ्यांच्या मुलांना, शिक्षणापासून वंचित असलेल्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणून त्यांना एक सुजाण, सुसंस्कृत नागरिक निर्माण करणे व त्यांना स्वावलंबी बनवणे निराधार महिला, विधवा, अंध, अपंगासाठी प्रत्यक्ष कृती आराखडा तयार करणे. मुलांमधील सुप्त गुणांचा विकास करणे. त्यांचा कल, आवडी-निवडी ओळखून त्यांना मार्गदर्शन करणे.
लक्ष्यगट : वंचित, उपेक्षित, अनाथ घटकातील मुले, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची मुले, अप्रगत मुलांचे समुपदेशन करणे. ऊसतोड, वीटभट्टी कामगारांच्या मुलांचे पुनर्वसन